कृषी कायद्यात शेतक-यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : संजय धोत्रे

0
402

विरोधक कायद्याआड राजकारण करीत असल्याचा आरोप

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला. कृषी कायद्याच्या माध्यमातून देशातील शेतक-यांना अडचणींच्या खाईतून बाहेर काढण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. शेतक-यांना भेडसावणा-या विविध समस्यांचा उहापोह कृषी कायद्यात करण्यात आला आहे. शेतीला आधुनिकतेची जोड देताना त्यांचे उत्पन्न वाढावे, परवडणारी शेती व्हावी, योग्य बाजारपेठ मिळावी, हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतक-यांना योग्य सल्ला दिला जावा अशा बारीक सारीक बाबींना नवीन कृषी कायद्यात स्थान दिले असून भविष्यातील शेतकरी ताठ मानेने कसा उभा राहील, यास प्राधान्य दिले आहे,परंतु विरोधक शेतक-यांच्या आडून राजकारण करीत आहेत असे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे पत्रपरिषदेत बोलताना म्हणाले.
सोमवारी दिल्लीहून ऑनलाईन पत्रपरिषदेत त्यांनी कृषी कायद्याबाबत समग्र माहिती दिली. येथे जिल्हा भाजपाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात, महापौर अर्चना मसने, भाजपा प्रवक्ता गिरीश जोशी, माधव मानकर,अक्षय गंगाखेडकर, सोशल मीडिया प्रमुख मोहन पारधी उपस्थित होते.
धोत्रे म्हणाले, केंद्र शासनाने शेतक-यांना सक्षम करण्यासाठी आणलेले कायदे शेतकरी व जनतेला समजवून सांगण्याची वेळ आली आहे. कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब, हरियाणा राज्यात शेतक-यांनी कृषी कायद्या विरोधात आंदोलन उभारले आहे. शेतकरी हिताचे कायदे आंदोलनकर्त्या  शेतक-यांना केंद्र शासनाने चर्चेद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला  परंतु शेतक-यांना वेठीस धरून राजकारण करणारे विरोधक शेतक-यांची दिशाभूल करीत आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करीत असल्याने सावध राहण्याची गरज असल्याचे संजय धोत्रे यांनी सांगितले.
आंदोलनकर्त्या संघटनांच्या नेत्यांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात म्हणून कायद्यात बदल करण्याची तयारी शासनाने दर्शविली, तसे प्रस्ताव पाठवले.परंतु नेत्यांनी हेका सोडला नाही. एमएसपी योजना, सध्याची बाजार समित्यांची व्यवस्थाही कायम राहणार आहे. शेतक-यांना बाजार समित्यांबरोबरच शेतमालाच्या विक्रीचा  अधिकचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे शेतकरी  आपला माल पसंतीनुसार कोठेही विकू शकतील,कॉन्ट्रॅक्ट शेती   बाबत शेतकरी संघटनांना असलेले गैरसमजही केंद्र सरकारने दूर केले आहेत, असेही धोत्रे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. शेतक-यांमधील नवीन कायद्यांबाबत गैरसमज दूर होणे गरजेचे असल्याचे सांगून राज्यातील कापूस खरेदी गोंधळाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. खरेदी केंद्र सुरू करण्यात राज्य शासनाकडून दिरंगाई झाल्याचा आरोप त्यांनी केला.

कृषी कायद्याची वैशिष्ट्ये
–      शेतक-यांचे उत्पन्न वाढीसाठी पिकांचे विविधीकरण
–      कृषी क्षेत्रांत इको सिस्टीम आणणार
–      सुधारित बियाणे, खतांवर भर
–      आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर
–      कापणी पश्चात तंत्रज्ञानावर भर
–      शेतक-यांना बाजारपेठेचे नवीन पर्याय
–      संस्थागत पत व्यवस्था अधिक सुलभ
–      आधारभूत खरेदी प्रक्रिया मजबूत
–      एमएसपी, एपीएमसी पूर्वी प्रमाणेच राहणार

समस्यांचे निराकरण
शेतकरी संघटनांनी समर्पित निवेदनात नमूद आणि चर्चा केलेल्या मुद्द्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केंद्र शासनाकडून 14 तारखेला 14 ऑक्टोबर, 13 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, 3 डिसेंबर आणि 5 डिसेंबर कोणत्याही पूर्वग्रह न ठेवता व खुल्या मनाने करण्यात आला आहे. केले गेले आहे.दिनांक ३ डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांशी चर्चेनंतर या बाबींची ओळख पटविण्यात आली आणि केंद्र सरकारने त्यावर चर्चा करून तो सोडवण्याचा प्रयत्न केला.कृषी सुधार कायद्याची घटनात्मक वैधता, एपीएमसी मंडळे बळकट करणे, खासगी मंडळांचे वर्चस्व नसणे, व्यापा-यांची नोंदणी करण्याची व्यवस्था, कृषी कराराची नोंदणी, वाद निवारणासाठी दिवाणी कोर्टाचा पर्याय, शेतकर्‍यांची सुरक्षित जमीन, एमएसपी वर खरेदी व्यवस्था दुरुस्ती विधेयकात केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांच्या चिंता सोडविण्यासाठी, पेंढा जाळण्यावरील फौजदारी कारवाईशी संबंधित शेतकरी संघटनांच्या आशयाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि कायदेशीर बाबी स्पष्ट करण्यासाठी पुढाकार घेण्यात आले आहेत. हा उपक्रम शेतकरी संघटनांनी कोणतेही कारण न देता किंवा विशिष्ट युक्तिवाद सादर न करता फेटाळले आहेत. नवीन मुद्दे जोडून हे प्रकरण गुंतागुंतीचे होत आहे.
केंद्र सरकारसाठी शेती ही प्राधान्य आहे आणि शेतकर्‍यांचे हित सर्वांत महत्त्वाचे आहे आणि या उद्देशाने या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे आणि तेथील भीती दूर करण्यासाठी सरकारचे दरवाजे अजून हा उपक्रम सुरू ठेवण्यासाठी मोकळे असल्याचे ही या वेळी ना. धोत्रे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देतांना सांगितले.

Advertisements
Previous articleअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप!
Next articleव्हॉट्‌सअॅपचे ‘घोस्ट राइटर’ आहेत तरी कोण?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here