2 हजाराची लाच घेतांना मनपा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

0
191

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला:शहरातील भगतवाडी येथील एका नागरिकाच्या घराच्या टॅक्सची फाईल वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी 2 हजार रुपयाची लाच घेतांना पालिकेच्या पश्चिम झोन कार्यालयातील कर विभागातील लिपिक विजय खवले वय 46 यास लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी करण्यात आली.
सध्या महापालिकेच्या पथकामार्फत कर वसूली मोहिम राबविण्यात येत आहे. पथकातील कर्मचा-यामार्फत शहरात विविध भागात फिरून नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. पालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडून सुद्धा पथकाला सक्तीची करवसूली करण्यासंदर्भात निर्देश आहेत. याच मोहिमेचा एक भाग म्हणून कर वसूली पथकातील विजय खवले यांनी शहरातील भगतवाडी परिसरातील एका घराच्या टॅक्सची फाईल वरिष्ठांकडे सादर करून त्यात सुट मिळवून देण्यासाठी संबधित व्यक्तीला 2 हजार रुपये मागितले. अशा तक्रारीवरून लाच लुचपत विभागाने सापळा रचत लिपिकाला पैसे घेतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई प्रभारी पोलिस उपअधिक्षक आय.व्ही.चव्हाण यांच्या पथकाने केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.

Advertisements
Previous articleआठ लाखांहून अधिक गरजूंनी घेतला शिवभोजन थाळी योजनेचा लाभ
Next articleविविध मागण्यांसाठी एमआयएमचे निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here