विविध मागण्यांसाठी एमआयएमचे निवेदन

0
168

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

नांदुरा : विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठीएमआयएमच्या वतीनेजिल्हाधिकारी,तहसीलदार,नगर परिषद मुख्याधिकारी यांना 16 डिसेंबर रोजी निवेदनदेण्यात आले. 14 मुद्यांचा निवेदनात अंतर्भावआहे. यामधे गैबीनगरात सर्वत्र काँक्रिटीकरण
करावे, राष्ट्रीय महामार्ग ते नांदुरा खुर्द पर्यंत मंजूरझालेल्या रस्त्याचे काम लवकर करावे,गैबीनगरात घाण पसरल्यामुळे नाल्यांचीसाफसफाई करावी, गैबीनगरात नटूशाह यांच्या घरापासून फरिद मांडेवाला यांच्या घरापर्यंत वसलीम मंडपवाले यांच्या घराला लागून तिन्हीबाजूला नाली व रस्ता काँक्रिटीकरण करणे,शहरातील अल्पसंख्याक व दलित वस्तीत अंगणवाडी व शहीन कॉलनीमध्ये मंजूर झालेलीव्यायाम शाळा सुरू करावी,अंबादेवी गड ते जामा मशीद पर्यंत नदी काठी संरक्षण भिंत उभारावी,मंजूर झालेली घरकुले लाभार्थ्यांना बांधून द्यावी, प्रभाग क्रमांक 09 पैठ मोहल्ला नदीकाठी लागून पाण्याची विंधन विहीर बंद करण्यात आलेली आहे ती परत सुरू करावी,सहारा नगर,ख्वाजा नगर, गैबीनगर,शांतीनगर, गुरुदेव नगरसाठी पाण्याची टाकी व मंजूर झालेली 700 मीटर पाइपलाइन टाकावी,शांतीनगर वासियांना अंत्य यात्रेसाठी जाणा-या नागरिकांना गुरुदेव नगर जवळ नदीकाठ लागून नांदुरा खुर्द येथे स्मशानभूमी कडे जाणा-या रस्त्यावर काँक्रिटीकरण मोरी उभारावी, शाहीनकॉलनी सिद्धिकिया नगरमधे नाल्या व रस्त्याचे काम मंजूर झाले असून ते पूर्ण करावे,
अशामागण्यांचे निवेदन देण्यात आले. एमआयएमचे शहराध्यक्ष गफुर शेख, महासचिव असीम खान करीम खान,अमीर सोहेल, सलीम भाई,नफीस भाई, इसहाक़ भाई, डॉ.कलीमभाई, ज़फरभाई,शरीफभाई, शब्बीरभाई, शेख राजिक, अमीन
पहेलवान, हामीदभाई, रईस शेख, वसीम शेख नावेद शेख उपस्थित होते.

Advertisements
Previous article2 हजाराची लाच घेतांना मनपा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
Next articleआधी निघालेले आरक्षण रद्द झाल्याने अनेकांचा हिरमोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here