शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

0
212

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

बोरगावमंजू :येथील सिद्धार्थ नगर रहिवासी अमर मनोहर समुद्रे (20) या शेतकरीपुत्राने राहत्या घरी गुरुवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. अमरच्या घरची हलाखीची परिस्थिती असून आईच्या नावे अत्यल्प शेती नोंद आहे.
सततची नापिकी आणि आर्थिक विवंचनेतून अमर समुद्रेने आत्महत्या केल्याचे नातेवाईकां कडून सांगण्यात आले. बोरगाव मंजू पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठवला.
त्याच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here