देशासाठी आपले सर्वस्वपणाला लावणारे जेष्ठ विचारवंत हरपले!

0
58

आ.चंद्रकांत(दादा) पाटील, 
प्रदेशाध्यक्ष-भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते, ज्येष्ठ विचारवंत आणि संपादक मा.गो.वैद्य यांच्या निधनामुळे देशेसेवेसाठी संघर्ष करणारे झंझावाती वादळ शांत झाल्याची शोकभावना भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत(दादा) पाटील यांनी यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक,शिक्षक,पत्रकार,विधान परिषद सदस्य असा दांडगा अनुभव मा.गो.वैद्य यांच्या पाठीशी होता. राजकीय जबाबदारी असो वा संघाचे काम , मा गो वैद्य यांनी प्रत्येक भूमिका चोखपणे पार पाडली. देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावणे ही संघाची शिकवण त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे अंगिकारली होती. अशा या महान विचारवंतांच्या जाण्याने समाजात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांची उणीव नेहमी भासत राहील अशी खंत देखील आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here