भरधाव ट्रकची रुग्णवाहिकेला धडक; 1 ठार, 1 गंभीर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

0
208

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाना: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नांदुरा नजीक आंबोडा फाट्यासमोर भरधाव ट्रकने रुग्णवाहिकेला धडक दिली. याध्ये रुग्णवाहिका उलटून चालक जागिच ठार झाला तर आणखी 1 जण गंभीर जखमी झाला. ही घटना 19 डिसेंबररोजी दुपारी 2 वाजता घडली.
याबाबत सविस्तर असे की, ब-हाणपूर येथील ऑल इज वेल रुग्णालयाची रुग्णवाहिका नागपूरला रुग्ण सोडून परत जात होती. आंबोडा फाट्यानजीक विरुद्ध दिशेने येणा-या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेचे चालक गजानन राजेंद्र पाटील (वय २५) रा. लालबाग, ब-हाणपूर हे जागीच ठार झाले. तर रवींद्रसिंह बहाद्दरसिंह ठाकूर (वय २४) रा. वडनेर जोहरी, तालुका आस्था, जिल्हा सिहोर (म.प्र) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका १०८ चे अधिकारी डॉ. शेख, चालक गणेश वनारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉ. जैस्वाल, डॉ. बेंडे यांनी तातडीने उपचार केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने जखमीला अधिक उपचाराकरीता मलकापूर येथे हलवीण्यात आले. प्रवीण डवंगे, शिवा घाटे, सोहेल भाई यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.

Advertisements
Previous articleदेशासाठी आपले सर्वस्वपणाला लावणारे जेष्ठ विचारवंत हरपले!
Next articleशहिद प्रदीप मांदळे यांच्यावर 20 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here