आई बनली वैरीण

0
275

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

नांदुरा: नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या ठिकाणी 9 वर्षा च्या चिमुकल्याला त्याच्या सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याचा सांजतापजनक प्रकार समोर आला आहे.

पहिल्या पत्नीच्या मृत्यू नंतर सचिन शिंगोटे यांनी मुलगा आर्यनचा सांभाळ करण्यासाठी दुसरे लग्न केले. परंतु सावत्र आईने मुलाचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काल आईने मुलाचे हातपाय पकडून त्याला गरम तव्यावर उभे करून चटके दिले.मुलाने आरडा ओरडा केल्याने हा प्रकार शेजर्‍यांच्या लक्षात आला.विशेष म्हणजे हा सर्व प्रकार आर्यन चे वडील डोळ्याने पाहत असूनही त्यांनी मुलाला आईच्या तावडीतून सोडवले नाही.शेजर्‍यांनी आर्यन ची सुटका करून त्याला ताबडतोब खामगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अकोला येथे हलविण्यात आले.

Advertisements
Previous articleशहिद प्रदीप मांदळे यांच्यावर 20 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार
Next articleमुलानेच केला जन्मदात्या वडिलांचा खून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here