नागपूर रेल्वे स्टेशनवर अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना अटक

0
459

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

नागपूर: शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले राज्यमंत्री बच्चू कडू यांना मंगळवारी सकाळी नागपुरात पोलिसांनी गेस्टहाऊसमध्येच रोखून धरले. त्यांना सकाळी ९ विमानाने मुंबईला जायचे होते. आज मुंबईत रिलायन्सच्या समोर होणाऱ्या ;शेतकरी आंदोलनात ते सहभागी होणार होते. ते थांबलेल्या एरिगेशन डिपार्टमेंट; गेस्टहाऊससमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून प्रसिद्धीमाध्यमांना बाहेरच रोखण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखून धरलेल्या राज्यमंत्री यांना अखेरीस पोलिसांनी बाहेर पडण्याची अनुमती दिली व ते दुपारच्या विमानाने मुंबईकडे जाण्यासाठी रवाना झाले. कडू यांना सकाळी ९ विमानाने मुंबईला जायचे होते. आज मुंबईत रिलायन्सच्या समोर होणाऱ्या शेतकरी आंदोलनात ते सहभागी होणार होते. ;ते थांबलेल्या एरिगेशन डिपार्टमेंट गेस्टहाऊससमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यांना सकाळी बाहेर पडू दिले नव्हते. अनुमती दिल्याबद्दल सरकारचे आभार आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाण्याची अनुमती दिल्याबद्दल बच्चू कडू यांनी सरकारचे आभार मानले आहेत. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी, शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदा करावा असे मोदीजींना सरकारने सांगावे, असे मत व्यक्त केले.

Advertisements
Previous articleनवीन कोरोंना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे,मास्कचा वापर बंधनकारक करावा
Next articleग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा अन 25 लाखाचे बक्षीस मिळवा: आमदार राजेश एकडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here