2021 मध्ये होणार्‍या दहावीच्या परीक्षेसाठी आज बुधवार 23 डिसेंबर पासून ऑनलाईन अर्ज करता येणार

0
165

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे 2021 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेसाठी आज बुधवार दिनांक 23 डिसेंबर पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यामध्ये नियमित, पुनरपरिक्षार्थी यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विध्यार्थी,तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणार्‍या विध्यर्थ्यांना अर्ज करता येणार आहे.दहावीची परीक्षा देऊ इछिणार्‍या विध्यर्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.दहावीच्या परीक्षेसाठी नियमित विध्यर्थ्यांना 23 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 पर्यन्त तर पुनरपरिक्षार्थी,खाजगी विध्यार्थी,तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणार्‍या विध्यार्थ्यांना 12 ते 25 जानेवारी 2021 दरम्यान अर्ज करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here