कोरोना काळातील वीज बिल माफ करा : वामनराव चटप

0
222

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा:विदर्भातील जनतेचे कोरोना काळातील वीज बिल सरकारने भरावे, 200 युनिटपर्यंत वीज मोफत करावी, विदर्भातील शेतक-यांना सरसकट 25 हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई द्यावी तसेच स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी यासह इतर मागण्यांसाठी 4 जानेवारीला उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालण्यात येईल. आंदोलनात विदर्भवाद्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते
अ‍ॅड.वामनराव चटप यांनी केले.
26 डिसेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, कोरोना काळात उद्योग, व्यापार, रोजगार बंद होते. जनतेच्या खिशात पैसे नव्हते तरीही सरकारने 1 एप्रिलपासून 21 टक्के वीज दरवाढ लादली. त्याद्वारे सरकार वीज ग्राहकांकडून 6 हजार कोटी रुपये 5 वर्षात वसूल करणार आहे.

Advertisements
Previous articleअकोल्यातील मायलेक रेल्वेखाली येवून ठार
Next articleबुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी धडकले थेट दिल्ली च्या बॉर्डरवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here