बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी धडकले थेट दिल्ली च्या बॉर्डरवर

0
273

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
पंजाब, हरियाणा येथील शेतक-यांनी दिल्लीकडे जाणा-या पाच सीमांवर गत महिना भरापासून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलने केली. मात्र, निर्णायक तोडगा न निघाल्याने दिलेल्या इशा-यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह दिल्लीच्या बॉर्डरवर धडकले. सिंघू-गाजीपूर या दोन्ही ठिकाणच्या शेतकरी आंदोलनात सहभाग नोंदवत तुपकरांची मुलुख मैदानी तोफ धडाडली. आपल्या भाषणातून त्यांनी शब्दरुपी तोफगोळ्यांचा मोदी सरकारवर मारा केला.भ
महाराष्ट्रातील शेतकरी व नेते आंदोलनात सहभागी झाल्याने ‘अब हमारी ताकद दुगणी होई गयी है, सरकार को हमारी मांग के आगे झुकनाही है…’अशा भावना आंदोलनकर्त्या शेतकºयांनी रविकांत तुपकरांकडे यावेळी व्यक्त केल्या. तुपकर यांच्यासह कार्यकर्ते सिंघू-गाजीपूर बॉर्डरवर पोहोचून आंदोलनात सहभागी झाले. आपल्या आक्रमक बाण्याची वाणी तुपकरांनी दाखवून दिली. केंद्र सरकारला खडेबोल सुनावताना रविकांत तुपकर म्हणाले, सरकारला याचे गंभीर परिणाम  भोगावे लागतील  शेतकर्‍यांना सहज सोपे घेऊ नका, हा बळीराजा तुम्हाला कसा आडव्या हाताने घेईल हे समजणार नाही. पंजाब, हरियाणातील शेतकºयांचेच हे आंदोलन नाही, तर महाष्ट्रातील शेतकºयांचाही यामध्ये सहग आहे. महाराष्ट्राचा शेतकरी तुमच्या पाठीशी ताकदीने उ•ाा आहे, असा धीर देत तुपकर म्हणाले, सरकारला वाटते की शेतकºयांचा संयम संपेल. पण, आपला हक्क मिळवल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत. त्यांना हा कायदा पाहिजे नाही तर कशाला जबरदस्ती त्यांच्यावर तो लादता, असा सवाल करत अबानी, अदानीच्या हिताचाच हा कायदा आहे. ऊसाला जसा एफआरपी आहे, तसा इतर मालाला हमी•ााव का देत नाही? पाया•ाूत सुविधा न देता स्पर्धेत उतरवणे हे घातकी धोरण असल्याचे टीकास्त्र तुपकरांनी सरकारवर सोडले.

.अन्यथा आंदोलन तीव्र होईल: तुपकर
केंद्र सरकारने आपल्यातील अहंकार बाजूला ठेऊन चर्चा करावी. आठवडा•ारात शेतकºयांविरोधातील विधेयके रद्द न केल्यास महाराष्ट्रातील शेतक-यांचे जथ्थेच्या जथ्थे दिल्लीच्या पाचही सीमांठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनात धडकतील, असा इशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला. सद्यस्थितीत रविकांत तुपकर कार्यकर्त्यांसह ठाण मांडून आहेत. सिंधू व काजीपूर सीमांचे अंतर ५० किलोमीटर आहे. या दोन्ही ठिकाणच्या आंदोलनात ते सह•ाागी झाले. तसेच विविध राज्यांमधून आंदोलनात आलेल्या शेतकºयांच्याही त्यांनी •ोटी घेतल्या. आता पुढे हे आंदोलन काय वळण घेते, हे सांगणे सध्यातरी कठिण आहे.

महिना•ार महाराष्ट्रात आंदोलनांचे रान
दिल्लीतील आंदोलनाचा आवाज स्वा•िामानी शेतकरी संघटनेने महाराष्ट्रात विविध आंदोलनांच्या माध्यमातून बुलंद केला. राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात विविध आंदोलने करण्यात आली. मलकापूरला केलेले रेलरोको आंदोलन देश•ार गाजले. याशिवाय धरणे आंदोलने, रास्ता रोको, कृषिविधेयकांची होळी, अंबानींच्या कापोर्रेट कार्यालयावर काढलेल्या विविध संघटनांच्या मोर्चात स्वा•िामानीने सह•ााग नोंदविला. गत महिना•ारापासून आंदोलन पेटते ठेवण्यात आले होते. परंतु केंद्र सरकार शेतकºयांच्या संयमाचा अंतच पाहत असल्याने अखेर प्रत्यक्ष तेथील आंदोलनात सह•ाागी होण्याकरिता तुपकरांसह कार्यकर्त्यांनी उडी घेतली.

Advertisements
Previous articleकोरोना काळातील वीज बिल माफ करा : वामनराव चटप
Next articleकोरोनाने पोलिसाचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here