सरकारला लाज वाटली पाहिजे: रविकांत तुपकर

0
272

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : शैक्षणिक कर्ज मिळाले नाही म्हणून आत्महत्येची परवानगी द्या, नाही तर नक्षलवादी बनेन असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहून खळबळ उडवून देणाऱ्या वैभव मानखेर या विद्यार्थ्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी फोनवरून संवाद साधला, स्वाभिमानी शेतकरी संघटना वैभवच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या मनामध्ये नक्षलवादी होणाचा विचार येणे, हे तर राज्यकर्त्यांचे अपयश आहेच पण शेतकरी चळवळीचाही पराभव आहे, असे मत रविकांत तुपकरांनी व्यक्त केले..
खरंतर सरकारला लाज वाटली पाहिजे, कोणासाठी आणि कशासाठी आपण सत्ता चालवतो..? अशा प्रश्न तुपकरांनी उपस्थित केला आहे. शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांची ही प्रातिनिधिक व्यथा वैभवनी मांडली. सरकारने शेतकऱ्यांच्या मुलांचा शैक्षणिक कर्जाचा प्रश्न तात्काळ सोडविला पाहिजे, अशी मागणी तुपकरांनी यावेळी केली.

Advertisements
Previous articleकोविड सेंटरवरच झाले परिचारिकेचे डोहाळजेवण!
Next articleहे लोक महर्षी युगपथदर्शी, विजयी नाम अनोखा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here