ज्ञानगंगा अभयारण्यात रानगवा पर्यटकांचे वेधतोय लक्ष

0
129

व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: जिल्हामध्ये सन 1997 रोजी निर्माण करण्यात आलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात दि. 30 नोव्हेंबर 2019 रोजी सी – वन – टी – वन या पट्टेदार वाघाचे आगमण झाले होते. यावेळी ज्ञानगंगा अभयारण्याच्या क्षेत्रात वास्तव्य आहे. मात्र आता ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये दि. 6 डिसेंबर 2020 रोजी वन कर्मचारी हे जंगलगस्त करीत असतांना वन्यजीव परिक्षेत्राअंतर्गत आलेल्या देव्हारी बिटात अचानकपणे रानगवा निदर्शनास आला आहे.
योगायोग म्हणजे वाघाच्या आगमना नंतर बरोबर एका वर्षात या परिसरात रानगवा आढळून आल्याने ज्ञानगंगा अभयारण्यात पुन्हा नवीन पाहुण्यांचे पर्यटकांना दर्शन होणार आहे.   जिल्ह्यासाठी आनंदाची वन्यप्रेमीनसाठी सुखद करणारी बाब आहे. रानगवा नेमका कोठून आला असावा, याबाबत लवकरच शोध घेण्यात येणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील भरपुर प्रमाणात पाऊस पडला असून वन्यजीन परिक्षेत्राअंर्गत असलेल्या संपूर्ण बिटांचे काळजीपुर्वक काटेकोरपणे संरक्षण केल्‍यामुळे फार मोठया प्रमाणात गवत वाढले आहे. गवताची उंची सुमारे 9 ते 10 फुट असल्यामुळे वन्यप्राण्यांना संचार करणसाठी पुरेपुर वाव आहे. पुढील काळात पुन्हा वन्यप्राणी मोठया प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पर्यटकांनी ज्ञानगंगा अभरण्यात जास्तीत जास्त संख्येने पर्यटनास यावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी(वन्य जीव) म. द. सुरवसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Advertisements
Previous articleआधुनिक कृषी क्रांतीचा पाया रचणारे भाऊसाहेब देशमुख निरंतर प्रेरणादायी: प्रा. डॉ. राजेश मिरगे
Next articleनोकरीवरून काढल्याने वाढदिवशीच केला व्यावसायिकाचा गेम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here