जुन्या वादातून दिराने केला भावजयीचा खून

0
168

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जुन्या वादातून दिराने भावजयीला लाकडी दांड्याने मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला औरंगाबाद येथे हलवण्यात आले होते परंतु उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनला आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुलडाणा तालुक्यातील भादोला येथील आरोपी राजू चिंकाजी गवई (38) याने आपली वहिनी बेबी
संतोष गवई (55) वर्ष यांना 27 डिसेंबरच्या सायंकाळी   लाकडी दांड्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. महिलेला बुलडाणा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबादच्या  घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संतोष गवई यांच्या तक्रारीवरुन आरोपी राजू गवई विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तपास ठाणेदार सारंग नवलकर करत आहेत.

Advertisements
Previous articleनोकरीवरून काढल्याने वाढदिवशीच केला व्यावसायिकाचा गेम
Next articleविघ्न आलेल्या 76 जोडप्यांचे ‘भरोसा सेल’ने थाटले संसार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here