खरोसा लेणी … !!

0
159

युवराज पाटील

खरोसा ते किल्लारी अंतर अवघ 27 किलो मीटर… किल्लारी भूकंप प्रवण पट्टा… भौगोलिक दृष्टया कच्या बेसाल्टचा… खरोसा इथला डोंगर थोडा जांभ्या बेसाल्टचा पण पूर्ण पणे टणक ज्याला मराठीत काळा पाषाण म्हणतात तसा नसाल्यामुळे इथं लेण्या कोरण्या माग तत्कालीन कारण शिक्षण असू शकतं… जस वेरूळ, अजिंठा, कारला, बोरीवली इथल्या लेण्या चक्क काळ्या पाषाणात आहेत म्हणून अनेक आक्रमकांनी इथले आखिव रेखीव शिल्प तोडण्याचा प्रयत्न केला पण यश मिळाले नाही.

खरोसा लेण्याचे तत्कालीन राजकीय स्थान बघितले तर गुलाबर्गा जिल्ह्याच्या सीमेवर येते…राष्ट्रकूटाची राजधानी मान्यखेत इथून 170 किलोमीटर आहे… राष्ट्राकुटाचे मूळ गाव लातूर आहे (लट्टालूर )… वेरूळची एक नंबरची कैलास लेणी ही राष्ट्रकुटानी कोरल्याचा उल्लेख नागपूरच्या म्युझियम मध्ये आहे. म्हणजे त्याच्या साम्राज्याच्या काळात त्यांनी लेण्या कोरल्याचा उल्लेख असल्यामुळे आणि या 12 लेण्यातील जवळपास 6 लेण्या मध्ये विविध मुर्त्या कोरल्या आहेत… मुर्त्या आज तरी झिजल्या आहेत…

मुख्यलेणीत मात्र रामायणातील दृश्य कोरले आहेत… एका ठिकाणी हिरण्यकशिपुचे नरसिंह रूपातील विष्णुने पोट फाडल्याचे शिल्प आहे… वेरूळच्या कैलास लेण्यातील शिल्पाच्या रिपलिका वाटव्यात एवढे साम्य यात आहे.. तिथे काळा पाषाण असल्यामुळे झिज झाली नाही इथे मात्र कमालीची झिज झाली आहे… बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील लेण्यात आणि याच्या रचनेत बरेच साम्य आहे…

या लेण्याचा उद्देश शिक्षण देणं असावं आणि इथे छोटया गुंफा आहेत कदाचित त्या विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असाव्यात.. छोटे छोटे हॉल आहेत आणि विद्यागृहन केल्यानंतर त्यांना दिक्षा दिली जायची त्यासाठी दीक्षांत सभामंडप असायचा तसा मंडपपण इथे आहे… कागदोपत्री याचे काही पुरावे नाहीत पण डॉ. दाऊद दळवी यांच्या लेण्याच्या इतिहासातील पुस्तकात या लेण्यांचा उल्लेख आहे.

इतिहास किंवा पुरातत्वशास्त्र पुराव्याशिवाय तथ्य स्विकारत नाही… मी तर्कांनी मांडणी केली आहे.. त्यामुळे माझ्या मांडणीला तर्काच्या चष्मातून पाहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here