जिल्हा सामान्य रूग्णालयात पीसीपीएनडीटी कार्यशाळा उत्साहात

0
210

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी व मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या नर्सिंग स्कूल हॉलमध्ये पीसीपीएनडीटी कार्यशाळा आज 30 डिसेंबर 2020 रोजी उत्साहात पार पडली. दिप प्रज्वलनाने कार्यशाळेला सुरूवात करण्यात आली. कार्यशाळेमध्ये मुलींच्या जन्मदर वाढविणे, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करताना काय काय करावे, मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ता यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ घोलप, मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल बागर, जिल्हा सल्लागार समितीच्या डॉ वैशाली पडघान, विधी समुपदेशक ॲड वंदना काकडे, शासकीय अभियोक्ता ॲड संतोष खत्री, शाहीना पठाण, अधिसेविका श्रीमती राठोड आदी उपस्थित होते.
कार्यशाळेला मार्गदर्शन करताना डॉ. घोलप म्हणाले, पीसीपीएनडीटी कायदा हा लिंग चाचणी करणाऱ्यांसाठी कर्दनकाळ आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. स्त्री जन्मासाठी समाजमन बदलले पाहिजे. मुलापेक्षा मुलगी बरी हा संस्कार झाला पाहिजे. ॲड वंदना काकडे यांनी यावेळी समुचित प्राधिकारी यांचे कर्तव्य सांगितली. तसेच सोनोग्राफी सेंटरची तपासणी करताना कुठ कुठल्या गोष्टींची तपासणी करावी, तपासणीमध्ये काय काय बघावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ वैशाली पडघान म्हणाल्या, जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविणे गरजेचे आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी गावागावातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता, मदतनीस यांनी मोलाची भूमिका अदा केली पाहिजे. ह्या तीनही घटक समाजात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी समाजमन बदलवू शकतात.
शाहीना पठाण यांनी मुलीचे समाजातील, वैयक्तिक आयुष्यातील, देशासाठी असलेले महत्व पटवून दिले. त्यांनी समाजाने मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे आवाहनही केले. तसेच याप्रसंगी ॲड संतोष खत्री यांनी पीसीपीएनडीटी कायद्यातील बारकावे कथन केले. त्यांनी कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. संचलन सचिन सोळंकी यांनी तर आभार प्रदर्शन के. पी भोंडे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आहारतज्ज्ञ सचिन सोळंकी, के. पी भोंडे, विवेक जोशी आदींनी प्रयत्न केले. कार्यशाळेला वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

Advertisements
Previous articleकोरोनाने मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला मिळणार आर्थिक मदत
Next articleमिशनबिगीन अंतर्गत 31 जानेवारीपर्यंत आदेश कायम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here