पोलिसांच्या सामाजिक बांधीलकीने गाजले वर्ष

0
186

व-हाड दूत न्युज नेटवर्क

कोट्यवधींच्या हरविलेल्या वस्तू पहिल्यांदाच मिळाल्या परत

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला : अनेकांची वाहने, मोबाईलसह मौल्यवान वस्तू गहाळ होतात. वर्षानुवर्षे तपास सुरू राहतो. तरीही हाती काहीच येत नाही. मात्र प्रथमच जी.श्रीधर यांच्या रुपाने जिल्ह्याला संवेदनशील पोलिस अधीक्षक लाभले. अन् नागरिकांना चोरी गेलेल्या वस्तू परत मिळू लागल्या. शंभर दोनशेच्या नव्हे तर तब्बल एक कोटी 40 लाख 87 हजार 737 रुपयांच्या वस्तू परत मिळाल्या आहेत. वर्षभर पोलिसांनी राबविलेले सामाजिक उपक्रम अकोलेकरांच्या चिरस्मरणात राहणार आहेत.
चोरी, घरफोडीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात बँक, एटीएम व महत्वाच्या 210 ठिकाणी क्यू आर कोड सिस्टम बसविण्यात आली. सायबर सेलच्या माध्यमातून बँक, एटीएम व आस्थापनांवर पोलिस विभाग नजर ठेऊन आहे. त्याचप्रमाणे पोलिस विभागाची गुन्हेगार दत्तक योजनासुद्धा चर्चेत आहे. गुन्हेगारांना गुन्ह्यापासून परावृत्त करण्यासाठी 294 कर्मचा-यांना 1246 गुन्हेगार दत्तक दिले आहेत. त्यांच्यावर 23 नोडल ऑफीसरची नेमणूक केली आहे. बालकांच्या सुरक्षेसाठी त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी पोलिस काका व पोलिस दीदी उपक्रम सुरु केला आहे.
कर्मचा-यांना गँस लवकर उपलब्ध व्हावा यासाठी पोलिस दलाच्या कल्याण निधीतून स्वतंत्र गँस एजन्सी घेण्याचा पोलिस दलाचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस कर्मचा-यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाल्याने  निमवाडी येथे प्रशस्त इमारतीमध्ये पोलिस वसाहतीचे काम सुरु आहे. पोलिस स्टेशनमधील तक्रारींचा लवकर निपटारा व्हावा यासाठी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिवसाचे आयोजन करण्यात येत असते.

नेल्सन पद्धतीने तपास
जिल्ह्यातील गुन्ह्यांचा तपास नवीन पद्धतीने करण्यासाठी यापुढे नेल्सन पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. ठराविक तपास अधिका-यांवर कामाचा ताण न देता कामाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. पोलिस नाईक ते सहायक पोलिस उपनिरीक्षकांकडे रोटेशन पद्धतीने तपास दिला आहे.
तपासाची चक्रे वेगात
सन 2020 मध्ये घडलेल्या 39 पैकी 39 खुनाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस विभागाला यश आले आहे. तर खुनाच्या प्रयत्नाचे 63 पैकी 63 गुन्हे उघडकीस आले आहेत. दरोड्याचे दोन गुन्हे उघडकीस आले असून त्यामध्ये 13 लाख 34 हजार 643 रुपये मुद्देमाल जप्त केला. जबरी चोरीचे 27 पैकी 25 गुन्हे उघडकीस आणले आहेत. घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून 34 लाख 879 मुद्देमाल हस्तगत केला आहे. चोरीच्या आरोपीकडून 98 लाख 19 हजार 295 रुपयांचा चोरी गेलेला माल हस्तगत केला आहे.
पोलिस हाँस्पीटल
पोलिस कर्मचा-यांच्या कुटुंबियांना सवलतीच्या दरात उपचार मिळावे यासाठी पोलिस मुख्यालयात मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी डाँक्टर व नर्सची नियुक्ती केली आहे.  त्याचप्रमाणे पोलिस कँटीनही सुरु केले आहे. त्यामधून पोलिसांना किफायत दरात घरघुती साहित्य देण्यात येते.

Advertisements
Previous articleजिल्ह्यातील पहिली ग्राम पंचायत अविरोध! पळशी खुर्द येथे सात सदस्यांसाठी केवळ सात अर्ज
Next articleभिक्षेकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here