आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार पदं भरणार

0
67

नव्या वर्षात Good News!
आरोग्य मंत्री राजेश टाेपे यांची माहिती

व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबईः
 पुढील काही महिन्यात साधारण आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलीय. कोव्हिड संकटामुळे आरोग्य क्षेत्रात आवश्यक भरती केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यात नोकरभरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचंही आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं. (New Year 8,000 Posts Will Be Filled In Health Department, Health And Rural Development Department)
आता आगामी नव्या वर्षात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थेची सुविधा कशा प्रकारे असेल, याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनानं भरतीला मान्यता दिली आहे, अशी माहिती राजेश टोपेंनी दिलीय. सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
या वर्षात नागरिकांसह आरोग्य यंत्रणा कोरोनाशी यशस्वी लढा देत आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी त्यासाठीचे नियम पाळणे आवश्यक आहे. नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त जावो, अशा शुभेच्छा आरोग्यमंत्र्यांनी दिल्यात.

यावर दिला जाणार भर
१. मोबाईल सर्जिकल युनिट सुरू करावे
२. आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यमूल्यमापनासाठी कार्यप्रणाली करावी
३. आरोग्य योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा
४. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करावी
५. औषध खरेदीसाठी स्वतंत्र महामंडळ करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here