लाल मुंग्यांची चटणी कोरोनावर ठरणार रामबाण उपाय!

0
200

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
दिल्ली: कोरोनावरील लसीबाबत जगभरातील अनेक कंपन्यांकडून संशोधन सुरू असतानाच आता ओडिशा आणि छत्तीसगडमधील आदिवासी बांधव खात असलेली लाल मुंग्यांची चटणी कोरोनावर रामबाण उपाय ठरणार असल्याचे समोर आले आहे. या चटणीला लवकरच कोरोना विषाणूविरोधातील प्रभावी औषध म्हणून आयुष मंत्रालय लवकरच मान्यता देण्याची शक्यता आहे.
ओडिशा आणि छत्तीसगडसह देशाच्या अनेक भागांतील आदिवासी बांधव सर्दी-खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा आणि अन्य आजारांवर गुणकारी औषध म्हणून लाल मुंग्या आणि हिरव्या मिरचीचा समावेश असली चटणी खातात. त्यामुळेच आदिवासी भागात कोरोनाचा फारसा प्रसार झालेला नाही. त्याची दखल घेत नयाधर पाढीयाल यांनी सदर चटणीचा कोरोनावरील औषध म्हणून वापर करावा अशी मागणी केली होती.
मात्र त्याला प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने पाढीयाल यांनी ओडिशा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने लाल मुंग्यांच्या चटणीचा कोरोनावरील औषध म्हणून वापर करण्यासाठी अभ्यास करून तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश आयुष मंत्रालय आणि कौन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्चच्या महासंचालकांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाकडूनही या चटणीला कोरोना विषाणूविरोधातील औषध म्हणून मान्यता देण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीनी दिले आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी शक्ती
लाल मुंग्यांच्या चटणीमध्ये फॉर्मिक ऑसिड, प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन-बी 12, झिंक आणि लोह मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे आजारी पडले की ओडिशा, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, मेघालय येथील आदिवासी बांधव ही चटणी खात असल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे नयाधर पाढीयाल यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे. त्यामुळेच या भागात कोरोनाचा तितकासा फैलाव झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisements
Previous articleक्रिएटिव्हिटी अँड एक्सलुसिव्ह इनोव्हेशन अवॉर्डससाठी साताऱ्याचे बालाजी जाधव गुरुजींची निवड
Next articleनागपुरात यशस्वीपणे पार पडली लसीकरणाची ड्राय रन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here