कृषि विद्यापीठात क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
160

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला: आद्य क्रांतिकारक स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आद्य क्रांतिकारक, पहिल्या स्त्री शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षी जयंतीदिनी विशेष व्याख्यानाचे आयोजन करीत विद्यार्थी तसेच अधिकारी कर्मचारी वर्गाला सावित्रीबाई फुले यांचे कार्य अवगत व्हावे व त्यातूनच आपल्या जाणीव व जबाबदारीची उजळणी व्हावी हा कार्यक्रमांच्या आयोजनामागील उद्देश असतो तथापि यंदा covid-19 महामारी च्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील निवडक प्रसंग व त्या अनुषंगाने आजच्या समाजाला त्यांच्या विचारांची असलेली गरज अधोरेखित केली. विज्ञान युगातील प्रगत तथा आधुनिक महिला ही सावित्रीबाईंच्या त्यागाची फलश्रुती असल्याचे गौरवोद्गार सुद्धा डॉ. भाले यांनी याप्रसंगी काढले. देशांतर्गत शेती शाश्वत तथा शेतकरी समृद्ध होण्यासाठी कृषी सह पारंपरिक शिक्षण, संशोधन, विस्तार क्षेत्रातील सर्वच घटकांनी आपले सर्वोच्च योगदान देत आपला देश खऱ्या अर्थाने कृषिप्रधान सार्थ करावा असे आवाहन सुद्धा डॉ.भाले यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि कृषी क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत आदरांजली अर्पण करण्यात आली. संचालक विद्यार्थी कल्याण कार्यालयाद्वारे आयोजित या कार्यक्रमाचे प्रसंगी विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. महेंद्र नागदेवे, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, सौभाग्यवती खर्चे,अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्‍ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, सहयोगी अधिष्‍ठाता पदव्युत्तर शिक्षण संस्था डॉ. धनराज उंदीरवाडे , विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. किशोर कुबडे यांचेसह विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता, शास्त्रज्ञ,विभाग प्रमुख, अधिकारी -कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रा. डॉ.तांबे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. किशोर कुबडे यांचे मार्गदर्शनात डॉ. तांबे, डॉ. देशमुख,शशी भोयर, यांचेसह विद्यार्थी कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here