भंडारा शासकीय रुग्णालयात बेबी केअर युनीटला आग, 10 बालकांचा मृत्यू

0
336

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
भंडारा: संपूर्ण देशाला हादरवणारी घटना भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील लहान मुलांच्या युनिटमध्ये घडली आहे. रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झालाय. शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. धुरामुळे गुदमरुन या बाळांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.
लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा तातडीनं रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढलं. दरम्यान, 10 बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. तर 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे.

Advertisements
Previous articleपतंगाच्या मांजामुळे दुचाकीस्वार जखमी
Next articleअन रेल्वे प्रवाशाला केला मोबाईल परत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here