धांडेंच्या निवडीने सकारात्मक लेखणीचा सन्मान

0
117

संदीपदादा शेळके यांचे प्रतिपादन
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा : धडाडीचे पत्रकार, वृत्त निवेदक, सूत्रसंचालक म्हणून गजानन धांडे यांची जिह्यात ओळख आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने विविध विषयांवर परखड लिखाण केले. मराठी पत्रकार परिषदेच्या प्रदेश प्रतिनिधीपदी त्यांची झालेली निवड म्हणजे सकारात्मक लेखणीचा सन्मान असल्याचे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी केले.मराठी पत्रकार परिषदेच्या प्रदेश प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल श्री. धांडे यांचा शाहू परिवाराच्यावतीने शनिवारी गौरव करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. शेळके म्हणाले, गजानन धांडे यांनी हिंदुस्थान, पुण्यनगरी, महाराष्ट्र टाईम्स या दैनिकांमधून अनेक विषय लावून धरले. सिंदखेडराजा विकास आराखडा, खामगाव- जालना रेल्वे मार्ग, शेगाव विकास आराखडा, शेती, सिंचन, शिक्षण, क्रीडा, ग्रामीण भागातील समस्यांवर त्यांनी चौफेर लिखाण केले. त्यांच्या लिखाणाची दखल घेऊन शासनाने त्यांना तंटामुक्तीचा विभागीय पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. उत्कृष्ट खो-खो, क्रिकेट खेळाडू म्हणूनही त्यांचा परिचय आहे. राजर्षी शाहू परिवारासोबत त्यांचा नेहमीच स्नेह राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. सत्काराला उत्तर देतांना श्री. धांडे म्हणाले, आजवर अनेक ठिकाणी सन्मान झाला, पुरस्कार मिळाले. मात्र शाहू परिवाराच्या वतीने झालेला गौरव हा एक कौटुंबिक सत्कार आहे. या परिवारासोबत आपले भावनिक नाते आहे. माणसं जपणारी माणसं म्हणजे शाहू परिवार आहे. हा स्नेह असाच कायम राहो. संचालन सोहम घाडगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here