उभ्या ट्रकला कार भिडली; एकाच कुटुंबातील तिघे ठार

0
443

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

मलकापूर: उभ्या ट्रकला भरधाव कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत येथील भुरे कुटूंबातील तिघे ठार झाले. ही घटना नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर घडली.

नागपूर अमरावती महामार्गावर उभ्या असलेल्या डी डी 03- एम.9184 क्रमाकांच्या ट्रकला एमएच31- डीके 4426 क्रमाकांच्या कारने मागून धडक दिली. या धडकेत कारच्या बाजूला बसलेले डॉ. बाबूराव भुरे (वय 62) व त्यांचा मुलगा गणेश बाबुराव भुरे (वय 25) हे जागिच ठार झाले. तर मागे बसलेल्या वंदना भुरे ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी नेत असतांना त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. सदरचा अपघात हा गाडीला आेव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात घडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हिंगणा पोलिसांनी शुभम भुरे व ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. बाबुराव भुरे हे आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाले होते. ते सध्या नागपूर शहरातील दिघोरी परिसरातील पंचवटीत राहत होते. त्यांचे मुळगाव हे कुही हे असून ते मलकापूर येथील वृंदावन नगरातील रहीवासी असल्याने त्यांची मलकापूरात नेहमी ये-जा होती. या घटनेनंतर मलकापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Advertisements
Previous articleघे, शरीरच हवंय ना तुला माझं…!
Next articleतुला न मला घाल कुत्र्याला! अकोल्यात सरकारी गोदामात ११ हजार क्विंटल ज्वारी सडून झाला भूसा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here