मी पुन्हा येईल तुझ्या कुशीत…!

0
179

मी पुन्हा येईल तुझ्या कुशीत…!

नको गं आई रडूस,
आई, तुझं चुकलंच नाही गं,
ज्यांच्याकडे तु सोपवलं ना,
त्यांना आम्ही खेळणे वाटलो गं….
त्यांच्यासाठी रुग्ण असतो ऑब्जेक्ट
त्यांना कुठे असतात गं भावना….
आई, नाही कुणाला दोष द्यायचा मला
भ्रष्टाचाराने माझं आयुष्यच शॉर्ट केलं
आई तु रडली ना की,
मग मला त्रास होईल ना
आई, नको रडूस माझ्यासाठी
आई मी पुन्हा येईस्तोवर होशील का
अनाथ बालकांची आई
आई मी पुन्हा येईल ना तुझ्या कुशीत
तुझे तान्हुले म्हणून नक्कीच येईल
अनेक कळा सोसल्या तु माझ्यासाठी
थोडी कळ सोस अजून
आई रडू नको मी पुन्हा येईल तुझ्याच कुशीत….
तोपर्यंत बदलेल का गं व्यवस्था आणि मानवता ?

. सचिन देशपांडे, पत्रकार, अकोला
     9822713601

Advertisements
Previous articleतुला न मला घाल कुत्र्याला! अकोल्यात सरकारी गोदामात ११ हजार क्विंटल ज्वारी सडून झाला भूसा
Next articleराजमाता जिजाऊंचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणास्रोत ठरावे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here