अकोल्यात चिकन, मटणाचे भाव कायम! बर्ड फ्लूचा धोका नाही- जिल्हाधिकारी

0
151

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्ल्यू या पक्षांना होणाऱ्या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आलेला नसल्याने नियमित रोगनिदान सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.  चिकन, मटणाचे भाव कायम असून विक्रीवर कुठेही परिणाम झाला नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
राज्यातील काही जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. या धर्तीवर शहरातील काही चिकन,मटण विक्रेत्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता चिकनच्या मागणीवर कुठेही परिणाम झाला नाही. पोल्ट्री फार्ममधून मिळणा-या चिकनचा भाव 30 ते 35 रुपये किलो तर किरकोळ बाजारात चिकनचा भाव 40 ते 45 रुपये प्रति किलो आहे. मटणाचे भाव 100 ते 120 रुपये किलो आहे. कोंबडीची छोटी पिल्लं 20 ते 25 रुपये दराने विकली जात आहेत.  अड्यांचा सुद्धा भाव कायम असून 60 ते 70 रुपये डझन अंडी मिळतच आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तातडीने बैठक घेत यासंदर्भातील खुलासा केला. त्यामुळे नागरिकांच्या मनातून बर्ड फ्लूची भिती निघून गेली आहे. जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म चालक, पशुपालक यांनी मात्र खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
ते नमुने निगेटिव्ह
आतापर्यंत पोल्ट्री फार्म मधील ३५० पक्षांचे सिरो (नासिकाग्रातील स्त्राव) नमुने रोग अन्वेषण विभाग, औंध पुणे येथे पाठवण्यात आले. हे सर्व नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यावरुन जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्ल्यू नाही, असा निर्वाळा पशुसंवर्धन विभागाचे डॉ. बावने यांनी दिला आहे. शासनाच्या निर्देशानुसार पुन्हा जिल्ह्यातील १२ वेगवेगळ्या ठिकाणच्या १३० पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Advertisements
Previous articleबंदिस्त पान: अविस्मरणीय महाबळेश्वर
Next articleअनंतराव उंबरकर, सुवर्णमयी व्यक्तिमत्वाचे धनी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here