संक्रात साजरी करण्यासाठी गोव्याला जातांना अपघात, अपघातात १० मैत्रिणींचा जागिच मृत्यू

0
814
प्रवासात झोपलेल्या असतानाच काळाचा घाला
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बंगळुरु : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला टिपरने धडक दिल्यामुळे धारवाडमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी 17 महिला गोव्याला निघाल्या असताना काळाने घाला घातला.

कर्नाटकमध्ये धारवाड तालुक्यातील इटगट्टी गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला. पहाटे 3 वाजताच्या सुमारास टिप्परने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली. या अपघातात 10 महिलांचा जागीच मृत्यू झाला. प्रवासात झोपलेल्या असतानाच महिलांवर संक्रांत कोसळली. ह्या महिला देवनगरेतील महिलांच्या क्लबच्या त्या सदस्या होत्या. एकूण 17 महिला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी गोव्याच्या दौर्‍यावर निघाल्या होत्या. गोव्याला पोहोचण्यापूर्वी धारवाडजवळच भीषण अपघातात दहा जणींना प्राण गमवावे लागले. धारवाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महेंद्रकुमार यांच्या उपस्थितीत टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये अडकलेले दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
Advertisements
Previous articleअकोल्यात कोविड लसीकरणास सुरुवात, डॉ. आशिष गिरे ठरले पहिले लाभार्थी
Next articleधनंजय मुंडे प्रकरणाची बुलडाण्यात पूनरावृत्ती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here