सावधान! आईस्क्रीममध्येही सापडला कोरोना व्हायरस, 1000 पेक्षा जास्त जण क्वारंटाईन!

0
98

जग कोरोनापासून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनमधल्या तियानजिन (Tianjin) शहरात आईस्क्रीममध्ये (Ice cream) कोरोना व्हायरस सापडला आहे.

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई, 17 जानेवारी :  कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली 2020 या वर्षातील बहुतेक काळ गेला आहे. या नव्या वर्षातही कोरोनाचा धोका संपलेला नाही. ब्रिटनमधल्या नव्या कोरोना व्हायरसची जगभरत भीती आहे. अमेरिकेतही अजून परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. भारतासह काही देशांनी आता लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सुरुवात केली.
जग कोरोनापासून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनमधल्या तियानजिन (Tianjin) शहरात आईस्क्रीममध्ये  (Ice cream)  कोरोना व्हायरस सापडला आहे. ही बातमी समजताच आरोग्य अधिकारी सतर्क झाले असून त्यांनी हे आईस्क्रीम खालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या आईस्क्रीमच्या तीन सँपलमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे.

Advertisements
Previous articleधनंजय मुंडे प्रकरणाची बुलडाण्यात पूनरावृत्ती..
Next articleअकोल्यात ग्रा.प.निवडणूकीत कमळ फुलले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here