अकोल्यात ग्रा.प.निवडणूकीत कमळ फुलले!

0
230

व-हाड दूत न्युज नेटवर्क 
अकोला: जिल्ह्यातील
224 ग्रामपंचायत निवडणूक पैकी भारतीय जनता पक्ष 50 टक्के पेक्षा जास्त ठिकाणी विजय प्राप्त करून सत्ता प्राप्त करण्यात यश प्राप्त केला असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गिरीश जोशी यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री  संजय भाऊ धोत्रे
, जिल्हा भाजपा अध्यक्ष रणधीर भाऊ सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार गोवर्धन शर्मा, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात व विविध आघाडीचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने नेत्रदीपक विजय प्राप्त केला आहे. अकोला जिल्ह्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षावर जनतेने विश्वास व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास या कार्यक्रमांतर्गत जनतेने विश्वास व्यक्त केला व केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे यांची जनतेविषयी असलेली आपुलकी सद्भावना व विकासाचा सूत्र जनतेनी स्वीकारलेला आहे.
जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या कुशल नेतृत्वावर जनतेने विश्वास व्यक्त करून त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातील प्रत्येक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदारीने ग्रामविकासाचा सूत्र हाती घेऊन पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्मता वादाला अंगीकार करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला संवर्धन करण्याचं काम केला आहे
.
भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजय प्राप्त करून अकोला जिल्ह्यात स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्ष अनेक ग्रामपंचायत मध्ये किंग मेकर च्या भूमिकेमध्ये असल्यामुळे भारतीय जनता पक्ष पळसो बढे, चिखलगाव, निमकर्दा, भांबेरी, चोहोट्टा  बाजार, उरळ, शिनखेड, लोहगड, टिटवा,भटोरी लाखपुरी, शिरपूर, जामठी, आलेगाव सारख्या ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय प्राप्त केला आहे
.भारतीय जनता पक्ष कार्यालयात विजयी उमेदवार मोठ्या संख्येने येत असून त्यांचे स्वागत जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर तेजराव थोरात व भाजपाचे पदाधिकारी करीत असून जल्लोषाचा वातावरण भारतीय जनता पार्टी कार्यालय कार्यात सातत्याने दिवसभर सुरू होता.

Advertisements
Previous articleसावधान! आईस्क्रीममध्येही सापडला कोरोना व्हायरस, 1000 पेक्षा जास्त जण क्वारंटाईन!
Next articleमळणीयंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here