मळणीयंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

0
132

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
मोताळा: तळणी शिवारात 39 वर्षीय महिलेचा तूर काढताना मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाल्याची घटना 17 जानेवारीला घडली. या प्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्राप्त माहितीनुसार, तळणी येथील भारती सुनील खराटे ही महिला स्वत:च्या शेतात 17 जानेवारी रोजी मळणी यंत्राने तुरीची मळणी करीत होती. दरम्यान, त्या महिलेच्या डोक्याचे केस मळणी यंत्रामध्ये अडकल्याने ती यंत्रात ओढल्या गेली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तळणी येथील मिलिंद  बोदडे यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास ठाणेदार माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली बोराखेडी पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here