दत्ता पाटील यांच्यावर हल्‍ला करणा-या आरोपींवर कारवाई करा

0
218

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
जळगाव जा : शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता पाटील व त्‍यांच्‍या कुटुंबीयांवर 15 रोजी राजकीय आकसापोटी उसरा बु.येथे प्राणघातक हल्ला करणा-या शिंबरे कुटुंबीयांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ठाणेदार सुनील जाधव यांना निवेदन दिले.
दत्ता पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात कुटुंबीय गंभीर जखमी झाले. दत्ता पाटील यांची प्रकृती गंभीर असून त्यांना लवकरच उपचारार्थ मुंबई येथे हलवण्यात येणार आहे. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्यांना गजाआड करावे. तसेच दत्ता पाटील यांची हल्लेखोरांनी लंपास केलेली सोन्याची चेन तसेच हल्लेखोरांजवळचे शस्त्र पोलिसांनी हस्तगत करावे,अशी मागणीही निवेदनकर्त्यांनी केली आहे.
निवेदन देताना काँग्रेसच्या नेत्या डॉ.स्वाती वाकेकर, जि.प.चे माजी अध्यक्ष प्रकाश अवचार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र भोंगळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन वाघ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत दाभाडे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख पुंडलिक पाटील, नगरसेवक रमेश ताडे,श्रीकृष्ण केदार, ॲड. संदीप मानकर, अर्जुन घोलप, अब्दुल जहीर,संजय पारवे, संतोष बोरसे, मुस्ताकभाई,विजय काळे,रमेश हागे, अशोक तावरी, युवराज देशमुख, कैलास राजपूत,अक्षय पाटील, संजय भुजबळ,शेख चांद,योगेश पांढी, एजाज देशमुख,संजय दंडे, विशाल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
आम्ही लोकशाही मार्गाने चालणारे असून दत्ता पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे तालुका शिवसेनाप्रमुख गजानन वाघ म्हणाले. हल्लेखोरांपैकी पाचवा आरोपी बाळू पाटील याला सुद्धा ताब्यात घेण्यात येईल, तसेच पोलिस कायदेशीर कारवाई करीत असल्याचे ठाणेदार सुनील जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here