खामगावात काँग्रेसची बल्लेबल्ले, भाजपा पिछाडीवर

0
197

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींपैकी अनेक ग्राम पंचायतींवर काँग्रेस प्रणीत पॅनलने विजय मिळवला असून या निवडणुकीत भाजपाला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागल्याचे दिसून आले.
530 जागांसाठी नशीब आजमावणा-या 1306 उमेदवारांचे भाग्य आज ईव्हीएम मशिनने उलगडले़  8 वाजता मतमोजणीला सुरूवात होऊन 24 राऊंडमध्ये निकाल जाहीर झाला. ग्राम पंचायत निवडणुकीत तालुक्यात काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडीच्या पॅनलने घवघवीत यश प्राप्त केले. तालुक्यातील पिंपळगाव राजा, कोलोरी, रामनगर, बोरी अडगाव, टेंभुर्णा, सुटाळा खुर्द, वाडी, लाखनवाडा बु, पिंप्री देशमुख, सुजातपूर, आंबेटाकळी, शिरजगाव देशमुख या महत्वाच्या ग्राम पंचायतींवर झेंडा फडकवला आहे. तर भाजपाने शेलोडी, कंचनपूर, घाटपुरी, संभापूर, पिंप्राळा या ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. मतमोजणी प्रक्रिया सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होती़. मात्र दुपारपर्यंत घोषित झालेल्या निकालात काँग्रेसने अनेक ग्रामपंचायतींवर आघाडी मिळवल्याचे दिसून आले. विजयी पॅनल प्रमुखांनी मिरवणूक, ढोल ताशे आणि फटाके फोडले नाही़  मोजणी कक्षाजवळ पोलिसांचा बंदोबस्त होता़ मतमोजणी प्रक्रियेवर तहसीलदार डॉ. शितल रसाळ यांचे लक्ष होते.
गारडगावमध्ये ईश्वर चिठ्ठीवरून फैसला
गारडगाव ग्राम पंचायतीमध्ये वार्ड क्रमांक 3 मध्ये अन्नपूर्णा इंगळे व दीपिका इंगळे या दोन्ही उमेदवारांना 153-153 मते मिळाली. त्यामुळे या वार्डात निवडणूक टाय झाल्याने या दोघांचा पैसला आता ईश्वर चिठ्ठीने होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण व्हायची होती.
सुजातपुरात एक उमेदवार दोन वार्डातून विजयी
भाजपाच्या ताब्यात असलेल्या सुजातपूर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल विजयी झाले. यामध्ये शेषराव गोरे हे वार्ड क्र. 1 आणि 3 मधून निवडून आले. त्यामुळे त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे़ तर शेषराव गोरे यांची पत्नी वॉर्ड क्रमांक 2 मधून निवडून आल्या.
वंचितनेही मारली बाजी
ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही चांलीच बाजी मारली असून तालुक्यातील चितोडा, हिवरा ग्रामपंचायतींवर आपला दावा केला आहे. तर अनेक ग्रामपंचायतींवर वंचितचे उमेदवार विजयी झाल्याचे वंचितचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय वानखडे यांनी सांगितले.

Advertisements
Previous articleदत्ता पाटील यांच्यावर हल्‍ला करणा-या आरोपींवर कारवाई करा
Next articleग्रामीण जनतेचा भाजपलाच कौल, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला फेल, बुलडाणा जिल्ह्यात 50 टक्के ग्रामपंचायत वर भाजपचे वर्चस्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here