शेतक-याची गळफास लावून आत्महत्या

0
289

व-हाड दूत न्युज नेटवर्क
तेल्हारा: सकाळी शहरातील एका ५७ वर्षीय इसमाने स्वताच्या शेतात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.शहरातील मिलिंद नगर येथील ५७ वर्षीय भीमराव तुळशीराम तायडे यांच्याकडे जेमतेम चार एकर शेती असून कर्ज काढून शेतीला पैसा लावला मात्र यावेळी निसर्गाच्या लहरीपणा मुळे हातचे पिक गेले त्यात बँकेचे कर्ज आणि नापिकी मुळे विवंचनेत पडलेल्या भीमराव तायडे यांनी आपल्या स्वतच्या शेतात झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी दहा वाजता उघडकीस आली.याबाबत तेल्हारा पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला असून मृतक यांच्यामागे पत्नी दोन मुले,तीन मुलि;असा बराच आप्त परिवार आहे.पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहे.

Advertisements
Previous articleवाढीव वीजबिल सवलतीबाबत निर्णय घ्या, अन्यथा… स्वाभिमानीचा इशारा
Next articleकापूसाचे चुकारे वेळेत देण्यासाठी पणन महासंघाच्या १५०० कोटींच्या कर्जास शासनाची हमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here