कोरोना लस निर्मिती करणा-या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग

0
193

व-हाड दूत न्युज नेटवर्क 
पुणे :
पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला काही वेळापूर्वीच भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील मांजरा परिसरात सीरम इन्स्टिट्यूटची नवीन इमारत आहे. कोव्हिशील्ड या कोरोना विषाणूवरील लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. दुपारी दोन वाजता आग लागल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नाही
जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित असल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

Advertisements
Previous articleआजचे तरुण हे भारताचे भाग्यविधाते  – आ. सुधीर मुनगंटीवार
Next articleतांडव वेब सिरीजवर बंदी घाला- बजरंग दलाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here