शिर्डीला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या गाडीला अपघात, दोन ठार तर नऊ जन जखमी

0
185

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा: शेगाव ते शिर्डी देवदर्शनासाठी निघालेल्या देवठाणा जिल्हा वाशिम येथील भाविकांच्या स्कॉर्पिओ जीपला अपघात होऊन दोघे ठार तर नऊ गंभीर जखमी झाल्‍याची घटना शहरा लगतच्या वळण रस्त्यावर रविवारी रात्री साढे नऊ च्या सुमारास घडली भरधाव जीपने महामार्गावर उभ्या पोकलॅण्ड ला मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की धडक दिल्यावर भाविकांची जीप दहा फुट मागे फेकली गेली.अपघाताची माहिती मिळताच शिंदे हॉस्पिटल व श्री बालाजी महाराज संस्थान च्या अॅम्ब्युलेन्स  घटनास्थळी पोहचल्या व जखमींना रुग्णालयात हलविले.वैधकीय अधिक्षक डॉक्टर अस्मा शाहीन व त्यांच्या सहकारी डॉक्टर यांनी जखमींवर उपचार केले.

Advertisements
Previous articleराष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने काळीपिवळीला उडवले, पतीपत्नीसह तिघे जागिच ठार
Next articleमहाराष्ट्राला 57 पोलीस पदक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here