बुलडाण्यात बर्ड फ्लू ची एन्ट्री! पशुपालकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

0
538

प्रशांत खंडारे
व-हाड दूत न्युज नेटवर्क 

बुलडाणा : चिखली तालुक्यातील मौजे भानखेड येथील मृत पक्षांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. भोपाळ येथील लॅबवरून आज अहवाल प्राप्त झाला. बर्ड फ्ल्यू येणार अशी शक्यता होती. अखेर हा आजार आलाच ! याला अधिकृत दुजोरा अजून तरी कुण्या अधिकाऱ्यांनी दिलेला नाही. पशु संवर्धन विभागाच्या सुत्रांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. एकुण ४ कोंबड्यांच्या रिपोर्ट पैकी केवळ एका कोंबडीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शेतकरी जनार्दन इंगळे यांनी त्यांच्या शेतात 200 देशी कोंबड्यांचे पॉल्ट्रीफार्म सुरू केले होते. 23 जानेवारीला सकाळी कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. याच गावातील इतर नागरिकांच्याही एक-दोन अशा काही कोंबड्या दगावल्या होत्या.
या प्रकाराची माहिती मिळताच पशूधन तालुका अधिकारी डॉ. दांडगे, पशूवैद्यकीय लघु चिकित्सालयाचे डॉ. युवराज रगतवान, पर्यवेक्षक डॉ. प्रवीण निळे, डॉ. पूनम तायडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तीन कोंबड्यांचे नमुने अकोला येथे तपासणीसाठी पाठवले. भोपाळ येथील वरिष्ठ प्रयोगशाळेतून मृत कोंबड्यापैकी एका कोंबडीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या सर्व प्रकारावरून जिल्ह्यात बर्ड फ्लू दाखल झाला असे दिसून येते. पशुसंवर्धन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील आवश्यक कार्यवाही म्हणजे बाधीत क्षेत्र व निगराणी क्षेत्र घोषीत करणे, कलिंग करणे आदी उपाययोजना पशुसंवर्धन विभाग करत आहे. ‌नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहनही पशु संवर्धन विभागाच्या अधिका-यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here