मराठा आरक्षणासाठी खामगावात डफडे बजाओ

0
180

खामगाव: मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठवणे व अध्यादेश काढणे आणि आरक्षण टिकवण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलावीत या मागणीसाठी खामगाव येथे गुरुवारी, १७ सप्टेंबररोजी एसडीओ कार्यालयासमोर डफडे बचाओ आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी समाजातील ४२ तरुणांनी आत्मबलीदान दिले आहे. आंदोलन काळात १० ते १२ हजार तरुणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मराठा क्रांती मोर्चाने आंदोलने केलीत. त्यानंतरही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागू शकला नसल्याची खंत समाजातून व्यक्त होत आहे. त्यामुळे मराठा समाजातून सरकारबद्दल तीव्र रोष व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने सर्वाेच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, मराठा विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृहे सुरु करावेत, मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत शासनाने नोकरभरती करू नये, सर्व स्पर्धा परिक्षेतील व सारथीमधील जाचक अटी रद्द कराव्यात, न्यायालयाची स्थगिती असेपर्यंत मराठा समाजाला आर्थिक मागास प्रवर्गाचे आरक्षण देवून विद्यार्थ्यांचे शैक्षणीक शुल्क माफ करावे, आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांबाबत मराठा क्रांती मोर्चाचे वतीने जिल्हाधिकाºयांसह एसडीओ, तहसीलदारांना १५ सप्टेंबररोजी निवेदन दिले. हीच मागणी घेवून खामगावात सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीने स्थानिक एसडीओ कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक विचार न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

तोपर्यंत पोलिस भरती करू नका: आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर
मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतांना पोलिस भरती केल्यास समाजातील युवकांवर अन्याय होईल. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुर्णपणे सुटत नाही, तोपर्यंत आगामी पोलिस भरती करण्यात येवू नये असे खामगाव मतदारसंघाचे आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी म्हटले आहे. त्यांनी खामगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या डफडे बचाओ आंदोलनात सहभाग नोंदवत सकल मराठा समाजातील बांधवांशी चर्चा केली. भाजपाचा सकल मराठा समाजाच्या मागणीला पुर्णपणे पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले.

Advertisements
Previous articleपितृपक्ष ते प्रकाशपक्ष
Next articleअकोल्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू तर १६५ पॉझिटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here