बुलडाणा – बोथा खामगाव मार्ग 30 दिवस बंद राहणार

0
892

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

बोथा मार्ग वळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बुलडाणा : विदर्भाची वनपंढरी म्हणून ओळख असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्याच्या नुतनीकरण व मजबुतीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. कंत्राटदाराने यासाठी ३० दिवसांचे नियोजन केले असून ३० जानेवारी ते २८ फेब्रूवारी दरम्यान बुलडाणा- बोथा- खामगाव मार्ग बंद करून हा मार्ग बुलडाणा- वरवंड- उंद्री- खामगाव या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे.

बुलडाणा ते खामगांव राष्ट्रीय महामार्गावरील ज्ञानगंगा अभयारण्यातील रस्ता लांबीचे नुतनीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्याकरिता शासनातर्फे परवानगी प्रदान करण्यात आलेली आहे. सदर लांबीत नुतनीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने 30 दिवसाचे नियोजन केले आहे. या कालावधीत बुलडाणा ते खामगांव रस्त्यावरील वाहतूक बंद करुन 28 फेब्रुवारी पर्यंत या बुलडाणा- वरवंड-उंद्री-खामगांव या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  या पर्यायी मार्गासोबतच बुलडाणा-उंद्री – खामगांव, बुलडाणा – मोताळा – नांदूरा – खामगांव व  बुलडाणा – मोताळा – तरवडी -पिंपळगांव राजा -खामगांव अशी वाहतूक वळविण्यात आली आहे. उर्वरित कालाधीत वाहतूक नेहमी प्रमाणे सुरु राहील असे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. बुलडाणा ते खामगांव राष्ट्रीय महामार्गा वरील ज्ञानगंगा अभयारण्यातील रस्ता लांबीत नुतनीकरण व मजबुतीकरण सदर रस्त्यांचे लांबीत नुतनीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यासाठी बुलडाणा-खामगांव रस्त्यावरील वाहतूक बंद करुन सदर पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. दिनांक 28 फेब्रुवारी 2021 नंतर नियमितपणे ( रात्री 10ते सकाळी 5 हा कालावधी वगळून ) वाहतूक सुरु राहील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Advertisements
Previous article15 हजाराची लाच घेणाऱ्या पीएसआयला अटक
Next articleमन की बात .. रस्ता अपघात चिंतेचा विषय !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here