मन की बात .. रस्ता अपघात चिंतेचा विषय !

0
243

डॉ. स्वप्नील मंत्री यांच्या सूचनेचा पंतप्रधानांनी केला मन की बात मध्ये उल्लेख
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील डॉ. स्वप्नील मंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात साठी रस्त्याची सुरक्षा आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या संबंधी काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनांची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’मध्ये जनतेला या सूचनांचा अवलंब करावा, असे आवाहन केले आहे.

डॉ. स्वप्नील मंत्री यांनी संबंधित संकेतस्थळावरून अवघ्या काही दिवसा आगोदर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रस्ता सुरक्षा व बेटी बचाव बेटी पढाव विषयावर मन की बात मध्ये चर्चा करण्याविषयी सूचना मांडली होती. त्या सूचनेचा आदर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ता. 31 जानेवारी या वर्षातल्या पहिल्या मन की मन की बात मध्ये रस्ता सुरक्षा विषयी उल्लेख करून याच महिन्यात 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी आपला देश रस्ते सुरक्षा म्हणजेच रोड सेफ्टी मंथ साजरा करत असून रस्ते अपघात आपल्या देशासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. आज भारतात रस्ते सुरक्षेसाठी सरकारच्या बरोबरीने वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहे. आपला जीव वाचवण्यासाठी असलेल्या या प्रयत्नांमध्ये आपण सर्वांचं सक्रिय योगदान देण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून केले आहे.
https://www.facebook.com/search/top?q=narendra%20modi
आपल्या सूचनांचा मन की बात मध्ये उल्लेख केल्याबद्दल डॉ.  स्वप्नील मंत्री यांनी पंतप्रधानांचे आभार मानले व सामान्य माणसाच्या आवाजाला मन की बात मधून संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त दिले. डॉ. मंत्री यांचा मन की बात मध्ये उल्लेख झाल्याबद्दल वाशिम व जालना जिल्ह्यासहीत संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या मित्रमंडळी, नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

Advertisements
Previous articleबुलडाणा – बोथा खामगाव मार्ग 30 दिवस बंद राहणार
Next articleजन्मदात्यांचा सांभाळ न केल्यास 30 टक्के पगार आईवडिलांच्या खात्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here