जिल्ह्यातील 97 महसूल अधिकारी उद्या सामूहिक रजेवर

0
130

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क 

बुलडाना :यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नायब तहसिलदार वैभव पवार तसेच तलाठी गजानन सुरोसे यांच्यावर रेतीमाफीयांच्या टोळक्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच आरोपींविरुद्ध अद्याप कारवाई न झाल्याने जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी एकवटले असून ते उद्या 2 फेब्रुवारी रोजी सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात तहसिलदार, नायब तहसिलदार तसेच उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी देखील सहभागी होणार आहेत.बुलडाना जिल्ह्यातील 97 अधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याने उद्या महसूलचे कामकाज ठप्प होनार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here