कृतिप्रणवतेतून शरीर सुदृढतेचा दिला संदेश
प्रशांत खंडारे |
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: चालण्याच्या किंवा धावण्याच्या गुणांनी सर्वच परिचित असले, तरी त्याची अंमलबजावणी करणारे विरळच असतात. बुलडाण्यातील आमदार संजय गायकवाड यांची राजकारणातील ‘धाव’ बुलडाणेकरांना ठाऊक आहे मात्र काल ते दिल्लीत मंत्रालयीन कामासाठी गेले असता, दिल्ली गेटच्या रस्त्यावरही त्यांची भल्या पहाटेची ‘धाव’ आरोग्यदायी संदेश देणारी ठरली.
आरोग्य जपण्यावर प्रत्येकांनी भर दिला पाहीजे. कारण आरोग्य हीच धनसंपदा आहे. नियमित मॉर्निंग वॉक केल्यास वजन नियंत्रणात राहण्याव्यतिरिक्त आरोग्याला अन्य कित्येक लाभ मिळतात. शारीरिक ऊर्जा वाढते नेहमी थकल्यासारखे वाटत असल्यास शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवणे आवश्यक आहे. यासाठी मॉर्निंग वॉक करणे गरजेचे आहे. नियमित मॉर्निंग वॉक करणारे लोक शारीरिकदृष्ट्या अधिक अॅक्टिव्ह असल्याचे आढळते. दिवसाच्या सुरुवातीस २० ते ३० मिनिटांसाठी वॉक केल्यास आपल्याला दिवसभरातील काम करण्यास अधिक ऊर्जा मिळते. विशेष म्हणजे जी लोक नियमित मॉर्निंग वॉक करतात त्यांच्या शरीरात रात्रीपर्यंत ऊर्जा टिकून राहते. हीच ऊर्जा आम. संजय गायकवाड राजकारणासह समाजकारणात टिकवून आहेत. बुलडाण्यात त्यांना नेहमी वॉक करतांना पाहील्या जाते. मात्र काल दिल्लीतही त्यांनी आपल्या मॉर्निंग वॉक कडे दुर्लक्ष होवू दिले नाही,हे विशेष म्हटले पाहीजे.