पोलिओऐवजी 12 चिमुकल्यांना पाजलं सॅनिटायजर्स !

0
104

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: यवतमाळमध्ये 12 चिमुकल्यांना पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
यवतमाळमध्ये पोलिओऐवजी सॅनिटायझर दिल्याची ही अक्षम्य चूक‌ आहे. संबंधित अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात आली आहे. त्याविषयीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी हा प्रकार घडला. लहान मुलांना पोलिओच्या डोसऐवजी सॅनिटायजर पाजले. 12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. वय वर्ष ते पाच वयोगटातील ही लहान मुलं आहेत. आरोग्यमंत्र्यांनी घटनेची गंभीर दखल घेत तिथल्या जिल्हा परिषदेच्या सीईओंना दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार  अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना उशीरा जाग आलीय. जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी आज (मंगळवार) उपचार घेणाऱ्या चिमुकल्यांची भेट घेतलीय. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणाहीची गय केली जाणार नाही, असं यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कालिंदा पवार यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here