वृत्तपत्रात शासकीय नोटीसद्वारे बातमी प्रकाशित केल्याने संपादकावर पोलीस कारवाई

0
277

जिल्ह्यातील पत्रकारानी केला निषेध
मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क

बुलडाणा: जिल्ह्यातील नांदुरा येथील एका वृत्तपत्रात नगरविकास मंत्रालयाने नांदुरा  नगराध्यक्षा बाबत पाठविलेल्या नोटीसाद्वारे बातमी प्रकाशित केल्याने वृत्तपत्र संपादक यांच्या विरुद्ध नगराध्यक्ष पतीने पोलिसात बदनामी केल्याची तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता संपादकावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारची पत्रकारावर कारवाई केल्याने जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये पोलिसांप्रती रोष व्यक्त केला जात आहे.  या घटनेचा जिल्ह्या पत्रकार संघटना, टीव्ही जर्नलिस्ट एसोसिएशन, वृत्तवाहिनी पत्रकार संघटना, विदर्भ पत्रकार संघटना सह आदि
पत्रकार संघटनानी जाहिर निषेध व्यक्त केला आहे.
जिल्ह्याधिकारी एस. रामामूर्ती व जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांना सर्व पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात पत्रकारांवर केलेल्या कारवाईची चौकशी करुण नांदुरा ठाणेदारवर कारवाई करण्याची मागनी केली आहे. नगरविकास मंत्रलयाने पाठविलेली नोटीस प्रकाशित करणे हा गुन्हा नसून तो पत्रकारांचा अधिकार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले तसेच पोलिस कारवाई करणे म्हणजे पत्रकारांची मुस्कटदाबी करने होय. नुकताच पत्रकार संरक्षण कायदा अमलात आला असून पत्रकारांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र
तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यातिल पत्रकारांनी नांदुरा ठाणेदार यांची तात्काळ उचलबांगड़ी करुण कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी निवेदन सादर करतांना जिल्हा पत्रकार संघाचे नितीन शिरसाठ, चंद्रकांत बर्दे, अजय बिलारी, सिध्दार्थ आराख, रंजितसिंह राजपूत, वसिम शेख, संजय जाधव, युवराज वाघ, प्रेमकुमार राठोड, भानुदास लकडे, कासिम शेख, संदीप वंत्रोले, दिपक मोरे, संदीप शुक्ला, नितीन कानडजे पाटील, आदेश कांडेलकर, निलेश राऊत, यशवंत पिंगळे, शैलेश वाकोडे, प्रविण डवंगे, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम भातुरकर, वैभव काजळे, भाऊसाहेब बावने, विनोद गावंडे, राजेश काजळे,
तुकाराम रोकडे, किशोर खैरे, सुहास वाघमारे, विवेक पाऊलझगडे, महेश पांडे, संतोष तायडे उपस्थित होते.

Advertisements
Previous articleशिवस्मारकासाठी उदयनराजे सह खा. संभाजी भोसले बुलडाण्यात !
Next articleसामान्य रुग्णालय व क्रीड़ा संकुलला जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी राजे यांचे नाव द्यावे- अजय घनोकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here