सामान्य रुग्णालय व क्रीड़ा संकुलला जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी राजे यांचे नाव द्यावे- अजय घनोकार

0
215

मंगेश फरपट 
व-हाड दूत न्युज नेटवर्क
नांदुरा: येथे निर्माणाधीन असलेल्या सामान्य रुग्णालय व क्रिडा संकूलला जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी राजे यांचे नाव द्यावे असा मनोदय नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती अजयभाऊ घनोकार यांनी व्यक्त केला आहे.
जगतगुरु तुकाराम महाराज यांनी मानव निर्माणचे कार्य केले व आजही त्यांचे नावे हे कार्य सुरु आहे.तर छत्रपती शिवाजी राजे यांनी मानवतेतुन राष्ट्र निर्माण चे कार्य केले व आजही आजची लोकशाही ही त्यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या राज्याचीच प्रतिकृती आम्हास डॉ बाबासाहेब यांचे मुळे मिळाली आहे.
छत्रपती शिवाजी राजे यांना स्वराज्य निर्माण करता करता अचानक आलेले वैराग्य जगतगुरु तुकाराम महाराज यांचे उपदेशाने चैतंन्या मधे बदलले. आणि छत्रपती शिवाजी राजे यांच्या शक्तिला जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या भक्तीने मोठा आधार मिळाला व स्वराज्य निर्मिती मधे भक्तीशक्ती चा हा संयोग सदैव प्रभावी ठरला तो आज देखील ठरत आहे.
भक्तीशक्तीच्या या संगमाचे प्रतीक असलेल्या या दोन्ही महापुरुषांच्यां कार्याची आठवण आमच्या सारख्या सामान्य प्रापंचिक मानवास रहावी कारण आमच्या प्रपंच्याचे ओझे आम्हास कधी कधी भारी पड़ते. अशा वेळी अशा थोर पुरुषांच्या नावाच्या जय घोषाने पण नवचैतन्य निर्माण होते.म्हणून जऱ अश्या भव्य वास्तुस या महापुरुषांची नाव दिली तर त्या वास्तु मधे तर चैतंन्य येईलच सोबत आम्हा सर्वसामान्य लोकांना देखील एक प्रेरणा मिळेल, असे अजय घनोकार यांनी म्हटले आहे.

Advertisements
Previous articleवृत्तपत्रात शासकीय नोटीसद्वारे बातमी प्रकाशित केल्याने संपादकावर पोलीस कारवाई
Next articleकाकाजींच्या प्रेरणेने अनेक जीवन घडतील ती उत्तम स्मरणिका : डॉ. मोहन भागवत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here