वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय मागे घ्या – भाजपाचा इशारा

0
335

अन्यथा महावितरण कार्यालयांना टाळे ठोकू !
व-हाड दूत न्युज नेटवर्क

अकोला: राज्यातील 72 लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडीत करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरीत मागे घ्यावा अन्यथा 5 फेब्रुवारीला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जिल्हाभर महावितरण कार्यालयांना टाळे ठोकतील, जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे महापौर अर्चनाताई मसने महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात किशोर पाटील असा इशारा यांनी दिला आहे.
कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र, आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही. भाजपाचे कार्यकर्त 5 फेब्रुवारीला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. तसेच वीज पुरवठा खंडीत करण्यास येणाऱ्या महावितरण च्या कर्मचाऱ्यांना अटकावही करतील.
फडणवीस सरकारच्या काळात आम्ही कधीच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली तरी तो भार वाढत भाजपा महायुती चे सरकारने स्वत:वर घेतला. राज्य असताना कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या. पण वीज कंपन्यांही फायद्यात राहील्या होत्या. जर आम्हाला हे शक्य होते तर आताच्या सरकारला का कठिण आहे, असा सवालही श्री. जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात किशोर पाटील महापौर अर्चनाताई मसने कुसुमताई भगत यांनी केला.
कोरोना काळात आवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही. अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच 100 युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करून आधिच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नका, असेही श्री. आमदार सावरकर आमदार शर्मा आमदार भारसाकळे आमदार पिंपळे महानगराध्यक्ष अग्रवाल थोरात यांनी नमूद केले.

Advertisements
Previous articleकाकाजींच्या प्रेरणेने अनेक जीवन घडतील ती उत्तम स्मरणिका : डॉ. मोहन भागवत
Next articleप्रभू श्रीराम मंदिर निर्माणासाठी मूकबधिर परिवाराचा सहयोग प्रेरणादायी- आ. गोवर्धन शर्मा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here