प्रभू श्रीराम मंदिर निर्माणासाठी मूकबधिर परिवाराचा सहयोग प्रेरणादायी- आ. गोवर्धन शर्मा

0
181

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: प्रभू रामचंद्राच्या मंदिर निर्माणात प्रत्येकाचे योगदान असावे. या दृष्टीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने सुवर्ण संधी प्राप्त करून दिली व प्रत्येकाचा खारीचा वाटा उचलून प्रत्येकाच्या जनभावनेचा आदर केला. रामजन्मभूमी आंदोलनात प्रत्येकाचा सहभाग होता. त्यामुळे प्रत्येकाची भावना, श्रद्धा, भक्तीचे प्रतीक म्हणून रामभक्त घरोघरी येऊन योगदान संकलन करत आहेत.
याला प्रत्येक नागरिक तन-मन-धनाने श्रद्धेने व खोलेश्वर रजपुरा या भागातील मूकबधिर परिवाराने आपली जमापुंजी कष्टाने जमा करून श्रीराम जन्मभूमि मंदिरासाठी अर्पण केली ही गोष्ट प्रेरणादायी व राम भक्तांना नमन करणारी  असल्याचे प्रतिपादन श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवा अधिकारी आ. गोवर्धन शर्मा यांनी केले.       श्रीराम जन्मभूमी संकलन समर्पण निधीअंतर्गत घरोघरी संपर्क अभियानाचा शुभारंभ करून अनिकट, कमला नेहरू नगर, खोलेश्वर, राजपुरा या भागात आमदार शर्मा घरोघरी जाऊन निधी संकलन करत आहे. याप्रसंगी सौ उषा घनश्याम शाहू व घनश्याम शाहू या मूकबधिर परिवाराने या कार्यक्रम मध्ये श्री समर्थ नगर समिति चे अध्यक्ष संतोष पांडे, उपाध्यक्ष मनोज साहू, सुरेन्द्र चव्हान, देवेंद्र तिवारी, गिरिराज तिवारी, छगन साहू, डॉ शाम शर्मा, सौ चन्दा ठाकुर, सौ मंगला शर्मा, सौ निशा कढी, सौ सविता कांबळे, विक्की ठाकुर, रवि साहू, गणेश सपकाल, राजेश शिंदे, अशोक सहारे आदी उपस्थित होते.

Advertisements
Previous articleवीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय मागे घ्या – भाजपाचा इशारा
Next articleअनैतिक संबधातून अकोट तालुक्यात हत्याकांड दोघांची हत्या, एका महिलेचाही समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here