अनैतिक संबधातून अकोट तालुक्यात हत्याकांड दोघांची हत्या, एका महिलेचाही समावेश

0
204

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोट: तालुक्यासाठी मगंळवार हा क्राईम डे ठरला. १ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अकोट तालुक्यातील ग्राम सुकळी येथे चुलत भावाने भावाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला तर दुसरीकडे ग्राम अकोली जहाँगीर येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दोराने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली.
१ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ग्राम सुकळी येथील दिपक शेषराव हरमकार याने त्याच्या पत्नीसोबत अनैतिक सबंध असल्याच्या संशयावरून त्याचा चुलत भाऊ मृतक गोपाल धनराज हरमकार वय २७ वर्ष यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली याप्रकरणी दिपक शेषराव हरमकार याच्यावर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली आहे.
दुसर्‍या घटनेत ग्राम अकोली जहागीर येथील निर्मला अशोक सोनवणे वय 55 वर्ष ह्या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती अशोक सोनवणे याने दोराने गळा आवरून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली या प्रकरणी पोलीसानी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती हा घटनास्थळावरून फरार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here