अखेर मुहुर्त ठरला ! सरपंच निवडणूक ३ टप्प्यात..

0
143

मंगेश फरपट 
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्राम पंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांची निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी जाहीर केली आहे. ९,१०, व ११ फेब्रुवारी अशा ३ टप्प्यात ही निवडणूक होणार आहे.
जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान घेण्यात आले. त्याचा निकाल १८ जानेवारी राेजी जाहीर झाला. दरम्यान आता सरपंच काेण हाेणार, याविषयी गावागावात चर्चेचे फड रंगत होते. जिल्हा प्रशासनाने आधी जाहीर केलेले सरपंचपदाचे आरक्षण रद्द करण्यात आले. त्यानंतर २७ जानेवारी राेजी तहसीलस्तरावर व २९ जानेवारी जिल्हास्तरावर महिला आरक्षण साेडत काढण्यात आली. तत्पूर्वी मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचातींसाठी निवडणूक प्रक्रीया राबवण्यात आली.
यापैकी २८ ग्रामपंचायती अविराेध झाल्याने ४९८ ग्रामंपचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान घेण्यात आले. या मतदानाचा निकाल १८ जानेवारी राेजी जाहीर करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण पॅनल विजयी झाले. दरम्यान जिल्ह्यातील लोकनेत्यांनी आप आपल्या पक्षाने सर्वात जास्त जागा काबीज केल्याचा दावा केला होता.मात्र सरपंच निवडणूकी नंतरच पूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याने सरपंच निवडणूकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. अखेर जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी ९,१०,११ फेब्रूवारी अशा ३ टप्प्यात सरपंच व उपसरपंच निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे.

Advertisements
Previous articleअनैतिक संबधातून अकोट तालुक्यात हत्याकांड दोघांची हत्या, एका महिलेचाही समावेश
Next articleराज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या कार्यालयाचे विरमातेच्या हस्ते उद्घाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here