राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या कार्यालयाचे विरमातेच्या हस्ते उद्घाटन

0
249

मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच !

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

मुंबई: राज्यमंत्री मा.ना. श्री. बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील नवीन कार्यालयाचे उदघाटन वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

सन 1995 मध्ये भारत – पाकिस्तान युध्दात भारताच्या उत्तर सरहद्दीवरील कुपवाडा येथे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी शहीद झालेल्या कॅप्टन विनायक विष्णू गोरे यांच्या त्या मातोश्री आहेत. श्रीमती गोरे यांनी आपला मुलगा शहीद झाल्यानंतर राज्यातील शाळाशाळांमध्ये जाऊन देशाच्या संरक्षणासाठी युवा पिढीने पुढे आले पाहिजे म्हणून व्याख्यानाव्दारे युवकांचे प्रबोधन केले. श्रीमती गोरे यांची तब्बल 8 पुस्तके आणि विविध वर्तमानपत्रात जनजागृती करणारे लेख प्रसिध्द आहेत. माहे जानेवारी, 2017 मध्ये बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. विशेष म्हणजे श्रीमती गोरे या पार्ले टिळक विद्यालयातून मुख्याध्यापिका पदावरुन सेवानिवृत्त झाल्या आहेत.

आपल्या कार्यालयाचे उदघाटन वीरमातेच्या हस्ते व्हावे, अशी मा. राज्यमंत्री बच्चू कडू यांची इच्छा होती आणि श्रीमती गोरे यांना उदघाटनाचा सन्मान देऊन अत्यंत आदराने आज मंत्रालयातील त्यांच्या दालन क्र. २३१, दुसरा मजला चा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रहार पक्षाचे आमदार श्री. राजकुमार पटेल, पक्षाचे बल्लूभाऊ जवंजाळ, खाजगी सचिव अनुप खांडे, विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, विजय बोरसे, निलेश देठे, अमोल मेश्राम, जिवन कडु तसेच अनेक पदाधिकारी आणि मंत्रालयातील त्यांचे अधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.

Advertisements
Previous articleअखेर मुहुर्त ठरला ! सरपंच निवडणूक ३ टप्प्यात..
Next articleशेगाव नगरपालिकेवर दगडफेक ; कर्मचा-यांनी थांबवले कामकाज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here