‘स्टॅच्यू ऑफ पिस’ने सालईबन फुलले !

0
176

मंगेश फरपट 
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: दृष्टीभ्रमाचा उपयोग केल्यानंतर दिसणारी ही अद्भूत कलाकृती आहे. याला ॲनॉमॉफिॅक स्कल्प्चर किंवा इल्युजन म्हणतात. विशिष्ट कोनातून व अंतरावरून पाहिले तरच गांधीजींची प्रतिमा दृष्टीस येते. इतर बाजूने पाहिल्यास फक्त धातूच्या पट्ट्या दिसतात. दक्षिण आफ्रिकेत असलेले नेल्सन मंडेला यांची कलाकृती पाहून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली आहे.
(खालील व्हिडीआे शेवटपर्यंत पहा.. जेणेकरून स्टॅच्यू ऑफ पिस (शांती शिल्प) तुम्हाला दिसेल) 

भारतातच नव्हे तर जगात पहिल्यांदाच गांधीजीचे असे भव्यदिव्य शांती शिल्प ( स्टॅच्यू ऑफ पीस) सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील तरूणाई फाउंडेशनच्या सालईबन प्रकल्पावर उभारण्यात आले आहे. हे भव्य शांती शिल्प तरुणाई फाऊंडेशनचे सचिव राजेंद्र कोल्हे यांनी स्वतः तयार केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here