निम्न ज्ञानगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतल्या धरणात उड्या

0
386

मोबदला न मिळाल्याने जलसमाधी चा प्रयत्न, शेतकरी आक्रमक

मंगेश फरपट |
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील निमकवळा येथील ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळख असलेल्या निम्न ज्ञानगंगा प्रकल्पाचे काम पुर्ण झाले असले तरी अद्याप शेतक-यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोणार सरोवराची पाहणी करीत असतानाच इकडे धरणात उड्या घेवून जलसमाधीचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता घडली. पोलिसांनी धाव घेत शेतक-यांना पाण्यातून बाहेर काढले.
लघुपाटबंधारे योजने अंतर्गत धरणाचे काम पूर्ण केले असले तरी प्रशासनाने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना आजपर्यंत मोबदला मिळाला नाही. त्यामुळे 26 जानेवारी पासून शेतकर्‍यांनी प्रकल्पस्थळी आमरण उपोषण सुरु केले होते. मात्र या आंदोलनाला प्रशासनाकडून दुर्लक्षित केले गेल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज टोकाचे पाऊल उचलीत ज्ञानगंगा धरणामुमधेच उड्या घेऊन जलसमाधीचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. बुलढाणा जिल्ह्यात आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जिल्ह्यात दाखल होत असतानाच त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी घेतलेल्या त्या टोकाच्या पाऊलामुळे एकच खळबळ उडाली आहे.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अवथळे अटक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी शुक्रवारी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र शुक्रवारी पहाटेच पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांना ताब्यात घेऊन खामगाव पोलीस स्टेशनला आणले यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत धरणांमध्ये उड्या घेतल्या.

Advertisements
Previous articleमहावितरणच्या केंद्रांना टाळे ठोकून माझा वाढदिवस साजरा करा – आमदार आकाश फुंडकर
Next articleलोणार सरोवराच्या विकासासाठी नियोजित आराखडा तयार करा: मुख्यमंत्र्यांचे निर्देश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here